Red Section Separator

बँकिंग क्षेत्रातील एक महत्वाची अपडेट समोर आली असून काही बँकांनी आपल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Cream Section Separator

नेमक्या कोणत्या आहेत या बँका व किती व्याजदर वाढवले आहे, ते आपण जाणून घेऊ.

PNB हाऊसिंगने ठेवीच्या कालावधीनुसार, मुदत ठेवींवर व्याजदर १० ते २५ आधार बिंदूने (बेसिस पाँईट्स) वाढवले आहेत.

PNB हाऊसिंग फायनान्सचे नवे व्याजदर १५ जून २०२२ पासून लागू केले जाणार आहेत.

PNB हाऊसिंग फायनान्स ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मुदत ठेवींच्या गुंतवणुकीवर निश्चित परताव्या व्यतिरिक्त ०.२५ टक्के अधिक परतावा देत राहणार आहे.

अॅक्सिस बँकेने देखील मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. मुदत ठेवींवर सर्वसामान्य ग्राहकांना ५.७५ टक्के परतावा देण्यात येणार आहे.

अॅक्सिस बँकेने बचत खात्यात ५० लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या खातेदारांसाठी वार्षिक व्याजदर ३ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत.

Red Section Separator

स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात २० आधार बिंदूपर्यंत वाढ केली आहे.