Red Section Separator

आजकाल स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जास्तचा वापरामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.

Cream Section Separator

बॅटरी दीर्घकाळ टिकून राहील यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया.

इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फोनची 40 टक्के बॅटरी ही इंटरनेट डेटासाठी खर्च होते.

मोबाईल डेटाच्या ऐवजी वायफायचा वापर करा. यामुळे फोनची बॅटरी लाईफ वाढेल.

अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बॅटरी सेव्हिंग मोडचा वापर करता येतो.

अँड्रॉईडमध्ये ऑप्शन पॉवर सेव्हिंग मोड नावाने तर iOS मध्ये लो पॉवर मोड या नावाने आहे.

स्मार्टफोनवर व्हिडीओ स्ट्रीमिंग कमी केल्यास बॅटरीचं लाईफ वाढू शकतं.

फोनची बॅटरी वाचवण्यासाठी फोनचा ब्राईटनेस कमी करणं हा सर्वोत्तम उपाय आहे.

तसेच अँड्रॉईड 10 फोनमध्ये डार्क मोडचा पर्याय मिळतो याचा वापर केल्यास बॅटरीचं लाईफ वाढतं.

ज्या वेळी फोनचा वापर हा केला जात नाही त्यावेळी फोन एअरप्लेन मोडवर ठेवा जेणेकरून बॅटरी लवकर लो होणार नाही.