सध्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत सीएनजीवरील कार परवडत आहेत.
या कार कमी खर्चात चांगले मायलेज देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा वाहनांबद्दल
सीएनजी कारच्या बाजारात मारुती सुझुकीची सेलेरियो कार ही देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी सीएनजी कार आहे. ही कार १ किलो CNG मध्ये ३५.६० किमी मायलेज देते.
सीएनजी किट लावलेली मारुती सेलेरियो कार ७५ रुपयांमध्ये ३५ किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. या कारची किंमत ६.६९ लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी कंपनीची मारुती वॅगनआर सीएनजी कार १ किलो CNG मध्ये ३४.०५ किमी मायलेज देते. याची किंमत ६.४२ लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती अल्टो मॉडेलच्या सीएनजी कारची किंमत ५.३० लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार एक किलो सीएनजीमध्ये ते ३१.५९ किमीचं जबरदस्त मायलेज देते.
मारुती एस-प्रेसो सीएनजी कार 1 किलो सीएनजीमध्ये ३१.२ किमी मायलेज देते. याची किंमत ५.३८ लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा मोटर्सने या वर्षी आपल्या काही CNG कार भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. यातील टाटा टियागो सीएनजी कार मायलेजसाठी अतिशय चांगली मानली जाते.
ही कार एक किलो सीएनजीमध्ये २६ किमीपेक्षा अधिकचं मायलेज देते. याची किंमत ६.१० लाख रुपयांपासून सुरू होते.