Red Section Separator

डोळे जळजळ होण्याचे वाढते प्रमाण पाहता आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

Cream Section Separator

डोळ्यात आग होत असल्यास काकडीचे काप करून ते काहीवेळ डोळ्यावर ठेवावे.

डोळ्यांची आग होत असल्यास डोळ्यांवर बटाट्याचे काप ठेवावेत. यामुळेही डोळ्यात आग होणे कमी होते.

गुलाबजलाचा एक थेंब डोळ्यात घतल्यानेही डोळ्यातील आग कमी होण्यास मदत होते.

रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोक्याला व तळपायांना खोबरेल तेलाने चांगली मालिश करावी. यामुळे शांत झोप लागून डोळ्यात आग होणे थांबते.

दिवसातून दोन ते वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत.

उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरावा. गॉगल्समुळे डोळ्यात धूळ, कचरा जाण्यापासूनही रक्षण होते.

थंड दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि डोळ्यांवर फिरवा. यामुळे डोळ्यास थंडावा मिळतो.