Red Section Separator
पावसाळ्यात रोगराई आणि साथीचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.
Cream Section Separator
मग अशा पावसाळी आजारांवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. ते आपण जाणून घेऊ
गवती पात आणि आल्याचा वापर करून कडकडीत चहा बनवा आणि त्याचे सेवन करा.
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा बहुगुणी काढा पिणं कधीही फायदेशीर आहे.
हळदीमध्ये अँटी बॅक्टरील गुणधर्म असतात. ज्यामुळे हळद विविध आजारांवर प्रभावी भूमिका बजावते.
पावसाळ्याच्या दिवसात मस्त गरमागरम हळदीचं दूध रोज रात्री पिणे फायदेशीर आहे.
पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा घश्यातील संक्रमणाचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास आराम मिळेल.
पावसाळ्यात सर्दी झाली अशावेळी नाकात ३ थेंब गाईचे तूप घाला. यामुळे चांगला परिणाम मिळतो.
नियमित व्यायाम केल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहते.