मुलींच्या भुवया या त्यांच्या सौंदर्याचा एक भाग आहे. कारण त्या सौंदर्य वाढवण्याचे काम करतात.
मात्र काही मुलींच्या भुवयांचा कलर जास्त काळा नसतो. यासाठी तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता. .
कापसाच्या बोळ्याने दूध भुवयांवर फिरवा. यामुळे भुवयांवरील केसांना मूळासकट पोषण मिळण्यास मदत होते. परिणामी या ठिकाणी दाट केस वाढायला मदत होते.
रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मेथीदाण्याची पेस्ट करा. आंघोळ करण्यापूर्वी मेथीची पेस्ट भुवयांवर लावा. यामुळे भुवयांचे केसही दाट होण्यास मदत होते.
लिंबाची लहान फोड भुवयांवर फिरवा. एक चतुर्थांश नारळाच्या तेलामध्ये एक सोललेला लिंबू मिसळा. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण भुवयांवर लावा.
कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण अधिक असतं. यामुळे भुवयांवरील केसांची वाढ होण्यास मदत होते.
नारळाचं दूधही कापसाच्या बोळ्याने भुवयांवर लावल्याने फायदा होतो. रात्रभर नारळाचं दूध लावून झोपा. सकाळी चेहरा सामान्यपणे धुवाव.
अंड्याचा पांढरा भाग बाजूला करून उरलेला पिवळा बलक पातळ करून घ्या. आणि ते मिश्रण भुवयांना लावा. ते तुमच्या भुवया डार्क करण्यासाठी मदत करतील.
तुमच्या बोटांच्या मदतीने कस्टर ऑइल तुमच्या भुवयांना लावा. आणि अर्ध्या तासाने ते धुऊन काढा. यामुळे तुमच्या भुवया डार्क होण्यास मदत होईल.