नुकतेच जगभरातील पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे.
शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांमध्ये जपान, सिंगापूर, जर्मनी, दक्षिण कोरिया, इटली, फिनलंड, लक्झेंबर्ग, स्पेन, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क यांचा समावेश आहे.
मात्र काही असे देश आहे ज्यांचे पासपोर्ट कमकुवत आहे.
अफगाणिस्तान : या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात कमकुवत आहे. या यादीत अफगाणिस्तानला 112 वे स्थान मिळाले आहे.
इराक : इराकी पासपोर्ट 28 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्यास परवानगी देतात.
सीरिया : सर्वात कमकुवत पासपोर्टच्या यादीत सीरियाला तिसरे स्थान मिळाले आहे.
पाकिस्तान : पाकिस्तानी पासपोर्ट हा जगातील चौथा सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे.
येमेन : पासपोर्टच्या बाबतीत येमेन जगातील 5 व्या क्रमांकावर आहे.
भारत : या यादीत भारत 87 व्या क्रमांकावर आहे आणि पासपोर्ट धारक व्हिसाशिवाय जगातील 60 देशांमध्ये जाऊ शकतात.