Red Section Separator

पूजेसाठी असो कि स्वयंपकासाठी आपण घरात नारळ आणत असतो.

Cream Section Separator

नारळाची चटणी बनवण्यासाठी नारळ आणतो तेव्हा ते सोलून त्याची साल फेकून देतो.

मात्र नारळाच्या सालीचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे वापर केला जातो.

वास्तविक ते सेंद्रिय असून ते कुजत नाहीत. या कोरड्या आणि तंतुमय साली महिनोन्महिने कुठेही ठेवल्या तरी त्यात बॅक्टेरिया वाढत नाहीत.

तुम्हाला नारळाच्या सालीच्या मदतीने तुम्ही कोणकोणती कामे करू शकता ते सांगणार आहोत.

नारळाच्या सालीच्या मदतीने तुम्ही अनेक गोष्टी स्वच्छ करू शकता.

हे एक चांगले स्क्रबर आहेत ज्यात तुम्ही साबण घालून भांडी चमकवू शकता.

भांडी घासल्यानंतर तुम्ही या साली धुवून पुन्हा वापरू शकता.

कुंडीत माती भरण्यापूर्वी नारळाची साल टाकली तर कुंडीतील पाण्यामुळे झाडे कुजणार नाहीत.

तुम्ही नारळाच्या सालींनी पक्ष्याचे बनावट घरटे बनवू शकता आणि ते सजवू शकता.