Red Section Separator
हृदयविकाराचा संभाव्य धोका पाहता या दोन प्रकारच्या उपाययोजना फायदेशीर ठरतात.
Cream Section Separator
काही उपाययोजना हृदयविकार टाळण्यासाठी करता येतात.
काही उपाययोजना हृदयविकाराचं निदान झाल्यावर कराव्या लागतात.
हृदयविकार गंभीर आणि जीवघेणा ठरू शकणारा आजार असला, तरी काही उपाययोजनामुळे तो नियंत्रणात ठेवता येतो.
कोणत्याही स्वरूपाचं व्यसन हृदयविकाराला आमंत्रण देणारं ठरतं. त्यामुळे तंबाखूचा कोणत्याही स्वरूपात वापर टाळा.
धूम्रपान सोडल्यानंतर मृत्यूचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
अतिरिक्त वजन अनेक आजारांना आमंत्रण देणारं ठरतं त्यामुळं वजन नियंत्रित ठेवा.
हृदयविकाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी किंवा हृदयविकार नियंत्रणात राहण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करणं आवश्यक आहे.
दररोज पोषक आहार घेतल्यास हृदय निरोगी राहतं. तसंच ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर या बाबी नियंत्रणात राहतात.
प्रत्येक प्रौढ व्यक्तीनं रात्रीच्या वेळी किमान 7 तास झोप घेणं आवश्यक आहे.
ताण-तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी योगासनं, मेडिटेशन, छंद जोपासणं आदी गोष्टी करू शकता.