सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावणात महागदेवाची पूजा केली जाते.
मुख्यतः भारत आणि नेपाळमध्ये महादेवाची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते.
मात्र भारताव्यतिरिक्त असे काही देश आहेत जिथे महादेवाचे भक्त मोठ्या संख्येने आहेत.
मुनेश्वरम मंदिर, श्रीलंका : श्रीलंकेतील मुनेश्वरम मंदिर शिवभक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
अरुल्मिगु श्री राजकालियाम्मान मंदिर, मलेशिया : मलेशियातील हे शिव मंदिर 1922 मध्ये बांधले गेले होते, ज्याचे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते.
पशुपतिनाथ मंदिर, नेपाळ : नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरही खूप प्रसिद्ध आहे. येथे जगभरातून भाविक दर्शनासाठी येतात. भगवान शिवाचे हे अतिशय प्राचीन मंदिर काठमांडू येथे आहे.
झुरिच, स्वित्झर्लंडमधील शिव मंदिर : स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे असलेले हे शिवमंदिर त्याच्या वास्तुकलेसाठी खूप लोकप्रिय आहे.
शिव मंदिर, ऑकलंड, न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे असलेले शिवमंदिर आचार्य महामंडलेश्वर स्वामी शिवेंद्र महाराज आणि यज्ञबाबा यांनी बांधले होते.