काही घरांमध्ये पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होतात, त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनते.
कधी-कधी हे भांडण इतके वाढतात की पती-पत्नीच्या नात्यात दुरावाही येतो.
यासाठी लोकांच्या चुकांसोबतच वास्तुदोषदेखील कारणीभूत असू शकतात.
घरात वास्तुदोष असतील तर काही उपाय करून ते दूर करणे गरजेचे असते.
आम्ही तुम्हाला काही उपायांबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या साहाय्याने हि समस्या दूर होईल.
पुजाअर्चा करावी : घरामध्ये वास्तूदोष असेल तर, पूजा, होमहवन करा. त्यामुळे घरातलं वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
तुळस : तुळस घराच्या पूर्व दिशेला जरूर ठेवावी. तुळशीसमोर सकाळ-संध्याकाळ दिवा लावावा. या छोट्याशा उपायानेदेखील घरातील वास्तूदोष दूर होतात.
दरवाजे : तुमच्या घराला दोन दरवाजे असतील तर घरातील काही सदस्यांना मागचा दरवाजा वापरायची सवय असते. मात्र असं अजिबात करू नये. घराबाहेर जाण्या येण्यासाठी मुख्य दरवाजाचाच वापर करावा.
पौर्णिमा : घरात वास्तुदोष असल्यास पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडावं. यामुळे घरातील नकारात्मकता संपते.
मीठ : नकारात्मक ऊर्जा घरातून घालवण्यासाठी जाडं मीठ वापरावं. हे मीठ पाण्यात टाकून लादी पुसण्यासाठी वापरावं. यामुळे घरातले बॅक्टेरिया तर संपतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घरात कासव ठेवावं : तांबे किंवा पितळेचा कासव घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. हे कासव घरात उत्तर दिशेला पाण्याच्या भांड्यांमध्ये ठेवावं. त्यामुळे घरातल्या समस्या संपतात.