Red Section Separator

कापसावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाला आहे

Cream Section Separator

या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत जाणून घ्या

शक्य असेल तर पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत केवळ रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.

पतंगवर्गीय दुय्यम किडी जसे कापसाची पाने गुंडाळणारी अळी आणि कापसावरील उंटअळी यांचे नियंत्रण करण्यासाठी फवारणी करू नये.

अॅसीटामाप्रीड, इमिडॅक्लोप्रीड, क्लोथीयानीडीन आणि थायामिथॉक्झाम या नियोनीकोटिनॉइड गटातील कीडनाशके किडींची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे त्यांचा वापर टाळावा.

जागतिक आरोग्य संघटनेने अतिशय घातक वर्गामध्ये समाविष्ट केलेल्या कीडनाशकांचा जसे की मिथाईल पॅराथीयॉन, फोरेट, मोनोक्रोटोफॉस, कार्बोफ्युरॉन आणि मेटॉक्सिटॉक्स यांचा वापर करू नये.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पायरेथ्रॉइड्स यांचा वापर टाळावा.

कीडनाशकांचे मिश्रण करणे टाळावे. कीडनाशकांचे मिश्रण पर्यावरणाला जास्त घातक असल्यामुळे ते नवीन किडींच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरते.

शिफारस केलेल्या रासायनिक किडनाशकांची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.