Red Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

Cream Section Separator

23 मार्च 1987 मध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील छोट्या शहरात तिचा जन्म झाला.

कंगनाची आई शाळेत शिक्षिका आहे तर वडील व्यावसायिक आहे.

कंगनाचे पणजोबा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि आजोबा भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. तिचं एकत्रित कुटुंब होतं.

कंगना एक धाडसी अभिनत्री म्हणून ओळखली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की ती लहानपणापासूनच धाडसी आणि हट्टी होती.

कंगनाने सांगितलं होतं की जर तिच्या वडिलांनी भावासाठी प्लॅस्टिकची बंदुक आणि तिच्यासाठी बाहुली आणली तर तिला राग यायचा. ती याविरुद्ध बोलून दाखवायची.

जेव्हा कंगनाने सिनेसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हाही लोकांनी त्यासाठी नापसंती दर्शवली होती.

तिने मुंबईत येऊन खूप स्ट्रगल केलं. अनेकदा फक्त चपाती आणि लोणचं खाऊन तिने दिवस काढले होते.

कंगनाने आपल्या मेहनतीने यश मिळवलं. तिने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं.

लवकरच तिचा इमरजेन्सी आणि तेजस हे दोन सिनेमे येणार आहेत.