Red Section Separator
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने 2005 साली हजारो ख्वाहिशें ऐसी या चित्रपटातून पदार्पण केले.
Cream Section Separator
चित्रपटापेक्षा चित्रा वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत राहिली.
चित्रांगदाचे नाव दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्याशी जोडले गेले. या दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते.
चित्रपटात येण्याआधी चित्रांगदाने गोल्फपटू ज्योती रंधावाशी विवाह केला होता. पाच वर्षाच्या डेटिंगनंतर त्यांनी विवाह केला होता.
लग्नानंतर 12 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव झोरावर आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार सुधीर मिश्रासोबतच्या जवळच्या संबंधांमुळेचित्रांगदाचा घटस्फोट झाला.
ज्योती रंधावादेखील गुडगावमधील एका मैत्रीणीशी जास्त जवळ आला होता. यामुळेच दोघांच्या नात्यात दुरावा आला.
एका दिवशी सकाळी ज्योती रंधावा शेजारच्या घरातून बाहेर येताना दिसला. ज्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात ही वेळ आल्याचेदेखील वृत्त आले होते.
काही लोकांच्या मते चित्रांगदाला चित्रपट करिअरवर फोकस करायचा होता. पण ज्योती याबाबत फार सिरिअस नव्हता.
लग्नानंतर चित्रांगदा फक्त ४ चित्रपटात दिसली. ओटीटीवर मॉर्डन लव मुंबई यात ती दिसली होती. त्याआधी तिने बॉब बिस्वास हा चित्रपट केला होता.