Red Section Separator

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे.

Cream Section Separator

सुझान खान ही कधीच चित्रपटात दिसली नाही किंवा मोडेलिंग करताना दिसली नाही. पण तरी तिची ओळख बोल्ड आणि बिनधास्त लेडी अशीच राहिली.

खरे तर सुझान खान आणि हृतिक रोशन ही बॉलिवूडमधील सगळ्यात आयडिअल अशी जोडी होती. या दोघांनी 2000 मध्ये लग्न केले.

सुझान आणि हृतिकला रेहान आणि रिदान ही दोन मुले आहेत.

नंतर या नातेसंबंधांमध्ये दुरावा आला आणि अखेर 13 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.

या दोघांनी जरी घटस्फोट घेत एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी, मुलांचे संगोपन हे दोघे मिळून करत आहेत.

आता मात्र सुझान अर्सलान गोनी याला डेट करत आहे. या दोघांनी त्यांचं नातं जगजाहीर केल्यानंतर हे दोघंजण सातत्यानं चर्चेत असतात.

कधी ते एकत्र फिरताना दिसतात तर कधी एकत्र पार्टी करताना दिसतात.

इतकंच नाही तर सुझान अर्सलानसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते.