Red Section Separator

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी. गोपी बहू म्हणून प्रत्येकांच्या मनात स्थिरावली.

Cream Section Separator

आपल्या अभिनयाने अनेकांना आपल्या प्रेमात पाडणारी देवोलिना भट्टाचार्जी ही प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते.

देवोलिना भट्टाचार्जीचा जन्म 22 ऑगस्ट 1985 रोजी आसाममधील एका बंगाली कुटुंबात झाला.

तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले.

त्यानंतर ‘साथ निभाना साथिया’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2012 मध्ये ती या मालिकेचा भाग बनली होती.

या मालिकेने तिला 2014 साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि फेव्हरेट बहूचा पुरस्कार जिंकून दिला.

टीव्हीवरील वादग्रस्त शो बिग बॉस 13 च्या शोमध्ये तिने एका आठवड्यासाठी सुमारे 12 लाख रुपये मानधन घेतले होते.