Red Section Separator
अभितेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचे विविध लूक्सही व्हायरल होत असतात.
Cream Section Separator
दरम्यान तिने अलीकडेच एक स्वातंत्र्य दिनाआधी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती.
मीरा राजपूत कपूरने या कार्यक्रमात परिधान केलेल्या अनारकली लूकची विशेष चर्चा झाली.
तिने या खास कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाचा अनारकली परिधान केला होता.
अगदी साध्या असणाऱ्या या घेरदार अनारकलीवर पांढऱ्या रंगाचे नक्षीकाम करण्यात आले आहे.
त्यावरील जाळीदार ओढणी या लूकच्या सुंदरतेमध्ये अधिक भर घालत होती.
तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
शाहिदच्या पत्नीने परिधान केलेल्या अनारकलीची किंमत तुम्हाला माहितेय का? या ड्रेसची किंमत थक्क करणारी आहे.
रिद्धी मेहरा क्रिएशनच्या वेबसाइटवर तपासल्यास या अनारकली ड्रेसची किंमत 74800 रुपये अर्थात जवळपास पंचाहत्तर हजार रुपये आहे.