Red Section Separator
औरंगाबादमधला बिबी का मकबरा हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असून, ताजमहालाची प्रतिकृती असलेला हा वास्तुकलेचा आविष्कार आवर्जून पाहण्यासारखा आहे.
Cream Section Separator
औरंगाबादजवळची 17व्या शतकातली पाणचक्की पाहण्यासारखी असून, बाबा शाह मुसाफिर दर्गा परिसरही सुंदर आहे.
भारतातल्या पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान असलेली सुंदर अजिंठा लेणी औरंगाबादपासून 100 KM अंतरावर आहेत.
औरंगाबादपासून 30 KM अंतरावरच्या वेरूळची लेणी जगप्रसिद्ध असून, कैलासनाथ मंदिराचं स्थापत्य डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे.
गोदावरी नदीवरचं जायकवाडी धरण हेदेखील औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.
औरंगाबादच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातली शस्त्रास्त्रं, हस्तलिखितं त्या काळाच्या स्मृती जागवतात.
औरंगाबाद शहराच्या उत्तरेकडचा डॉ. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य म्हणजे निसर्गप्रेमींसाठी नंदनवनच.
दौलताबाद किल्ला अर्थात देवगिरीचा डोंगरांनी वेढलेला परिसर निसर्ग पर्यटनाचा आनंद देतो.
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेलं श्री घृष्णेश्वर मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना असून, ते वेरूळच्या येलगंगा नदीजवळ आहे.
52 दरवाजांचं शहर अशी औरंगाबादची ओळख होती. आता त्यातले काहीच दरवाजे शिल्लक असून, इतिहासाचे साक्षीदार म्हणून ते पाहण्यासारखे आहेत.