Red Section Separator
अनेकदा विवाहित जोडप्यांना गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर किती दिवसांनी सेक्स केलं पाहिजे, याबाबत संभ्रम असतात.
Cream Section Separator
जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर या बातमीतून याबाबतची माहीती जाणून घेऊय़ात.
आजकाल बहुतेक सिझेरियन प्रसूती होत आहेत. पण प्रसूती सिझेरियन असो की नॉर्मल महिलांना बरे व्हायला खूप वेळ लागतो.
प्रसूतीनंतर काही दिवसांतच आपण शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली, तर महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे प्रसूतीनंतर किमान 4 ते 6 आठवडे संबंध ठेवू नयेत.
जर एखाद्या महिलेची प्रसूती सामान्य पद्धतीने झाली असेल आणि अशा परिस्थितीत तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.
प्लेसेंटा बाहेर पडल्यामुळे गर्भाशयाला दुखापत होते. ही जखम भरून येण्यासाठी वेळ लागतो.
अशा स्थितीत संबंध बनवल्याने स्त्रीच्या शरीरालाही हानी पोहोचते. त्यामुळे नॉर्मल प्रसूतीनंतर किमान दीड महिना शारीरिक संबंध टाळावेत.
सिझेरियन प्रसूतीदरम्यान पोटाच्या खालच्या भागात जास्त टाके येतात. यातून स्त्रीला सावरायला खूप वेळ लागतो.
यास्थितीत शारीरिक संबंध ठेवल्यास हे टाके तुटण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रसूतीनंतर टाके पूर्णपणे कोरडे होईपर्यंत अंतर ठेवणे खुपच गरजेचे आहे.