Red Section Separator

सोनाली कुलकर्णीने यंदा तिच्या घरी गणपती बसवले नाहीत. मात्र, तिने फोटो पोस्ट करत आपल्या आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Cream Section Separator

तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल आणि अडचणी उंदराइतक्या लहान असाव्या असं कॅप्शन देत अभिनेत्री रुपाली भोसले हिने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत.

अभिनेत्री सायली संजीव हिने गणपती बाप्पा मोरया, असं म्हणत आपल्या घरातील आकर्षक असा बाप्पा सोबतचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुने आपल्या हटके अंदाजात हातात गणपती घेत चालत येतानाचा भन्नाट फोटो शेअर केला आहे.

अभिनेता सुबोध भावे याच्या घरी गणपतीसाठी केलेला देखावा त्याच्या मुलांनी केला आहे.

"आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी" अशी या देखाव्याची थीम आहे.

आपल्या घरी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत असं कॅप्शन टाकत अभिनेता स्वप्नील जोशी यांनी त्याच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

गौतमी देशपांडेने आपल्या ला़डक्या बाप्पासोबत सुंदर असं फोटोशूट केलं आहे. गणपती बाप्पा मोरया असं कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिलं आहे.

बाप्पा आलाय, आता सगळं छान होणार; सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा! असं Caption देत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने पत्नी मिताली मयेकर सोबतचा फोटो शेअर केला आहे.