Red Section Separator

31 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

Cream Section Separator

याच अनुषंगाने जर तुम्ही पुण्यात गणपती पाहायला जाणार असाल तर काही प्रसिद्ध मानाच्या गणपतीची लिस्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती - कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी - बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे.

पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि त्यानंतर दरवर्षी नव्या मूर्तीची स्थापना होते.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम - भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला.

या गणेशोत्सवाला १८८७ मध्ये म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होण्याच्या आधीच सुरुवात झाली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणेशमंडळ - हा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती - पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती म्हणून याची ओळख आहे. केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला.