Red Section Separator

एस. एस. राजामौली हे भारतातले अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शक असून, त्यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केलेले सर्वच सिनेमे हिट झाले आहेत.

Cream Section Separator

राजामौलींचा पहिला सिनेमा होता 'स्टुडंट नंबर 1.' 2001 सालच्या या सिनेमातून ज्युनिअर एनटीआरने Debut केला. तो सिनेमा हिट झाला.

2004 सालचा सॉय सिनेमाही हिट झाला. त्यामुळे तेलुगू अभिनेता नितीन सुपरस्टार झाला. तत्पूर्वी 2003 सिम्हाद्री हा सिनेमाही चांगला चालला होता.

राजमौलींच्या 2006 सालच्या 'विक्रमार्कुडु' या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 118 कोटींची कमाई केली.  या सिनेमामुळे अभिनेता रवी तेजाला नवी ओळख मिळाली.

2007चा 'यामाडोंगा' हा ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपट ठरला. त्यात ज्युनिअर NTR, मोहनबाबू आणि प्रियामणी होते.

2010 'मर्यादा रामण्णा' हा चित्रपट हिट झाल्यावर त्याचे अनेक भाषांमध्ये रिमेक करण्यात आले.

बाहुबलीमुळे प्रसिद्ध झालेला प्रभास त्याआधी राजामौलींच्या छत्रपती (2005) या सिनेमात झळकला होता.

2012 सालच्या 'मख्खी' (ईगा) या वेगळ्या Concept च्या चित्रपटाला 2 नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाले होते.

'मगधीरा' या पुनर्जन्मावर आधारित चित्रपटाने तब्बल 150 कोटींचा व्यवसाय केला आणि आणि 2 नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळवले.