Red Section Separator

सिनेसृष्टीतील जोडपी लग्न कधी करणार याबद्दल चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते.

Cream Section Separator

बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या जोड्यांच्या यादीत असलेलं एक कपल म्हणजे रिचा चड्ढा आणि अली फजल.

गेल्या दोन वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजलच्या लग्नाची तारीख सातत्यानं पुढे जात होती.

अखेरीस हे दोघं ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

लग्नाच्या आधीचे कार्यक्रम दिल्लीत आणि विवाह सोहळा व स्वागत समारंभ मुंबईत पार पडणार अशी माहिती समोर येतेय.

गेल्या पाच वर्षापासून रिचा आणि अली रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यामुळं अनेकदा दोघांना एकत्र पाहाण्यात येतं असे.

रिचानं ‘ओये लकी! लकी ओये’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने गँग्ज ऑफ वासेपूर १ आणि २ , फुक्रे यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या.

लवकरच अलीचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. केनेथ ब्रेनागच्या ‘डेथ ऑन द नाईल’ या हॉलिवूडपटात तो झळकणार आहे.