फवाद खान, वीणा मलिकसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करून लोकप्रियता मिळवली आहे.
भारतातल्या अनेक कलाकारांनीही पाकिस्तानी सिनेमांमध्ये काम केलं असून, लोकप्रियता मिळवली आहे. अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेऊ या.
अभिनेत्री किरण खेर यांनी 'खामोश पानी' या पाकिस्तानी सिनेमात काम केलं होतं. तिथल्या रसिकांना तो सिनेमा आवडला होता.
नेहा धुपियाने 'कभी प्यार ना करना' या पाकिस्तानी फिल्ममध्ये काम केलं होतं. त्यातलं तिचं गाणं आजही तिथे लोकप्रिय आहे.
सध्या कंगना रणौतच्या 'लॉक अप'मध्ये असलेल्या सारा खानने 'तुझसे ही राबता' या टीव्ही शोमध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी टीव्ही अभिनेता नीर हसनसोबत काम केलं होतं.
बिग बॉस, 'क्यों की सास भी कभी बहू थी' आदी सीरियल्समधला अभिनेता आकाशदीप सहगलने 'सल्तनत' या पाकिस्तानी फिल्ममध्ये व्हिलनचा रोल केला होता.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीनेही 'सल्तनत' या फिल्ममध्ये दमदार रोल केला होता. ही फिल्म दुबईत शूट झाली होती.
'कुसुम'मधली अभिनेत्री नौशीन सरदार अलीने 'मैं एक दिन लौट के आऊंगा' या पाकिस्तानी फिल्ममध्ये काम केलं.
Godfather या 2007च्या पाकिस्तानी सिनेमात विनोद खन्ना हृषिता भट्ट, अरबाझ खान, अमृता अरोरा, किम शर्मा, प्रीती जांघियानी अशा अनेक भारतीय कलाकारांनी काम केलं होतं.