Red Section Separator

फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात.

Cream Section Separator

पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा होत असते.

मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का? पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते.

प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता.

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

पपईमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात आढळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पपई खाल्ल्यामुळे वजण कमी होण्यास मदत होते.

सकाळी नाश्त्यापासूनच पपई खाण्यास सुरुवात करा. तुम्ही पपईचे सलाड खाऊ शकता, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतील.

दुपारच्या जेवणात पपईची कोशिंबीर देखील खाऊ शकता, त्यात पालक, टोमॅटो, मीठ, लसूण आणि लिंबाचा रस घातल्यास पौष्टिकतेत लक्षणीय वाढ होईल.

जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर तुम्ही पपईचा रस देखील पिऊ शकता, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.