तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 12 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे.
या मालिकेतील पोपटलाल हे पात्र प्रेक्षकांना चांगलंच भावलं आहे.
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या पोपटलाल यांचा प्रवास अनेक अडथळ्यांचा होता.
मात्र तारक मेहता मालिकेत काम सुरु केल्यानंतर पोपटलाल अर्थात श्याम पाठक यांचं आयुष्य बदलून गेलं.
खऱ्या आयुष्यात श्याम पाठक यांचं लग्न झालं असून त्याची कथा फारच रंजक आहे. तरुणपणी त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं.
श्याम पाठक हे त्यांची क्लासमेट रेशमीच्या प्रेमात पडले होते. घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
श्याम पाठक हे गेल्या 14 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा भाग आहेत. एका एपिसोडसाठी ते 60 हजार रुपये मानधन घेतात.
श्याम पाठक हे कोट्यवधींच्या मालमत्तेचे धनी आहेत. त्यांच्याकडे सुमारे 20 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे एक अलिशान मर्सिडीजदेखील आहे.