Red Section Separator

दीपिका पदुकोणला कोणत्याही ओळखीची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने आपले स्थान निर्माण केले आहे.

Cream Section Separator

दीपिकाला लहानपणापासूनच बॅडमिंटनपटू व्हायचे होते आणि या क्षेत्रात तिची कारकीर्द घडवायची होती हे आपणा सर्वांना माहीत आहे.

तिने सांगितले  की, ती पहाटे 5 वाजता उठायची, शारीरिक प्रशिक्षण करायची, शाळेत जायची, बॅडमिंटन खेळायला परतायची, तिचा गृहपाठ करायची आणि झोपायला जायची.

बॅडमिंटन व्यतिरिक्त दीपिका बेसबॉल देखील खेळली आहे! होय, या खेळात तिने अनेक राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या आहेत.

दीपिका जेव्हा अभ्यास आणि तिच्या क्रीडा कारकीर्द या दोन्ही गोष्टीवर लक्ष केंद्रित करत होती.

तेव्हाच ती एक लहान मॉडेल देखील होती. वयाच्या 8व्या वर्षी ती पहिल्यांदा एका जाहिरातीत दिसली होती.

2004 मध्ये दीपिकाने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. तिने एका फॅशन स्टायलिस्टच्या हाताखाली मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली होती.

मॉडेलिंगपासून सुरू झालेला प्रवास दीपिकाला बॉलिवूडमध्ये घेऊन आला आणि तिला 'ओम शांती ओम'च्या रूपाने पहिला चित्रपट मिळाला आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

दीपिकाने रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2012 मध्ये रणवीर सिंगला डेट करायला सुरुवात केली होती. 2018 मध्ये दोघांनी लग्नही केलं.