त्यामुळे लक्झरी कार कंपन्यासुद्धा इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच पाच लक्झरी इलेक्ट्रिक कारची माहिती देत आहोत ज्या एका चार्जमध्ये सर्वाधिक रेंज देतात.
BMW i4 : ही कार एका चार्जवर 590 किमी चालवू शकते. कारला शून्य ते 10% चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात. कारची एक्स शोरूम किंमत 69.90 लाख रुपये आहे.
Mercedes EQS 53 :मर्सिडीज EQS 53 ची सिंगल चार्ज WLTP रेंज 526 ते 580 किमी आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 2.45 कोटी रुपये आहे.
Kia EV 6 : ही कार एका चार्जवर 528 किलोमीटरची चांगली रेंज देते. Kia EV6 ची एक्स-शोरूम किंमत रु.59.95 लाख पासून सुरू होते.
Audi E Tron GT : 1.80 कोटी ते 2.05 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह, ऑडी ई-ट्रॉन जीटी कार 500 किमीची रेंज देखील देते.
Porsche Taycan : हे एका चार्जवर 451 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. याचा टॉप स्पीड 230 किमी प्रतितास आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 1.5 कोटी रुपयांपासून सुरू होते.