Red Section Separator

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल.

Cream Section Separator

तुमच्या बँक, डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नियम पहिल्या ऑक्टोबरपासून बदलणार आहेत.

पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. ते जाणून घेऊया.

सरकार पुढील महिन्यापासून अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये बदल करणार आहे.

आयकर भरणारे लोक यापुढे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. हा नवा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे.

डिमॅट खातेधारकांनी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत टू-फैक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करणे अत्यावश्यक आहे.

टू-फैक्टर ऑथेंटिकेशन इनेबल नसल्यास 1 ऑक्टोबरपासून डीमॅट खाते लॉग इन करू शकणार नाही.

रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड डेटा स्टोर ठेवण्यास मनाई केली आहे.

पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात पर्यायी कोड द्यावा लागेल. ज्याला टोकन असे नाव दिले आहे.

1 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत.