Red Section Separator

ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा डोळे आणि डोके दुखते.

Cream Section Separator

तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळे दुखीच्या समस्या निर्माण होतं आहे.

ऑफिसमध्ये सतत कित्येक तास काम करून कंटाळा आला की डोळ्यांना थोडा आराम द्या.

यासाठी थोडावेळ डोळे मिटून बसा आणि दीर्घ श्वास घ्या. यानंतर, तळवे एकत्र वेगाने घासून घ्या.

तळवे कोमट झाल्यावर ते पापण्यांवर लावा. हे काम तुम्हाला तीन-चार वेळा करावे लागेल.

डोळ्यांसमोरील कोणत्याही एका बिंदूकडे काळजीपूर्वक पहा आणि नंतर डोळ्यांच्या बाहुल्या एका काठावरुन दुसऱ्या काठावर केंद्रित करा.

डोळे धुतल्याने अनेक समस्या दूर होतात आणि आराम मिळतो.

जेव्हाही तुम्ही ऑफिसमधून घरी जाल तेव्हा एकदा थंड पाण्याने डोळे धुवा.

डोळ्यांच्या मज्जातंतूंना आराम मिळेल आणि तणाव दूर होईल.