Red Section Separator
चहामुळे तंदुरुस्ती जाणवते, फ्रेश वाटते. काम करण्यास उत्साह वाढतो.
Cream Section Separator
मात्र, चहाचे सेवन किती करावे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
कधी-कधी जेवणाच्या आधी चहा घेतला, तर नंतर भूक लागत नाही.
मग त्याचा परिणाम भुकेवर होऊन आपले आहाराचे वेळापत्रक बिघडून जाते.
म्हणूनच आज आपण चहाचे दुष्परिणाम काय आहेत हे जाणून घेऊ
अॅसिडिटी : वारंवार चहा प्यायल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास जाणवतो.
सकाळी उठल्या-उठल्या चहा पिणे, वारंवार चहा पिणे, जेवणाआधी.. जेवणानंतर लगेचच चहा पिणे.. आदी चहा पिण्याच्या सवयीने अॅसिडिटी होते.
भूक न लागणे : चहा प्यायल्याने भूक मरते. जेवणाच्या वेळी चहा प्यायल्यास, त्याचा परिणाम भुकेवर होतो. चहामुळे भूक लागत नाही.
झोपेवरील परिणाम : काहींना चहा इतका लागतो की, अक्षरश: त्याचा परिणाम झोपेवर दिसून येतो.