Red Section Separator
स्तनाचा कर्करोग हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे.
Cream Section Separator
४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ मध्ये आढळतात. यामध्ये काही अंशी अनुवांशिकता आढळते.
स्त्रियांमध्ये वयोगट ४० वर्षावरील महिला.तसेच ज्यांच्या घराण्यात या कर्करोगाचा इतिहास आहे अशा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो.
ज्या स्त्रिया स्थूल आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित गोळ्या घेत आहेत, अशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असू शकते.
जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, यामुळे महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे.
स्तन कर्करोगाचा सामना करण्यासाठी वेळोवेळी निदान आणि वेळेवर उपचार करणे काळाची गरज आहे.
दर महिन्याला सर्वच महिलांनी किमान १० मिनिटे वेळ स्वत:साठी राखून ठेवत पाळीच्या सातव्या दिवशी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
एखादी गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी सपर्क साधा.
स्तनातील गुठळ्या, सूज येणे, त्वचेचे निस्तेज होणे आदी बदलांचे परीक्षण करणे. यामुळे स्तनाचा कर्करोग ओळखला जाऊ शकतो,