Red Section Separator
मान्सूनचा पाऊस परतीच्या दिशेने निघाला असला तरी काही भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे.
Cream Section Separator
त्यातच आता आणखी मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
देशाच्या अनेक भागात अजूनही मान्सून मुसळधार पाऊस पडत असला तरी तो शेवटच्या टप्प्यात आहे.
उस्मानाबाद, बीड, लातूर, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
आज (ता. 27) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.
तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.