Red Section Separator
बुधवारी (२८ सप्टेंबर २०२२) जीवन विमा कंपनी एलआयसीचा स्टॉक सर्व वेळच्या नीचांकावर आला.
Cream Section Separator
ट्रेडिंग सत्रात एलआयसीचा शेअर बीएसईवर 620.15 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला.
एलआयसीच्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 5,622 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.
सरकारी विमा कंपनीचे शेअर्स गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
बीएसईवर शेअर 627 रुपयांवर उघडला. यापूर्वी 27 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 629.05 रुपयांवर बंद झाला होता.
बुधवारी व्यवहारादरम्यान, शेअर 620.15 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला. हा स्टॉकचा विक्रमी नीचांक आहे.
28 सप्टेंबर 2022 रोजी LIC मध्ये घसरण झाल्यानंतर, कंपनीचे मार्केट कॅप 3,92,877 लाख कोटी रुपयांवर आले.
आयपीओ दरम्यान कंपनीचे मूल्यांकन 6 लाख कोटी इतके होते.
या संदर्भात, आतापर्यंत एलआयसीच्या गुंतवणूकदारांचे सुमारे 2.07 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.