सण उत्सव काळात अनेक कंपन्यांकडून वाहन खरेदीवर अनेक ऑफर्सही दिल्या जातात.
जपानी कंपनी Honda देखील या सणासुदीच्या काळात नवीन बाईक किंवा स्कूटरखरेदीवर ग्राहकांना खास ऑफर देत आहे.
फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, कंपनी सर्व स्कूटर आणि बाइक्सवर पाच टक्के कॅशबॅक देत आहे.
याशिवाय, काही अटींसह फायनान्सवर शून्य डाऊन पेमेंट देखील दिले जात आहे.
यासोबतच कंपनी या सणासुदीच्या हंगामात नो कॉस्ट ईएमआय आणि नो हायपोथेकेशन ऑफर करत आहे.
कॅशबॅकसाठी, कंपनीने स्टँडर्ड चार्टर्ड बँक तसेच फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक, वन कार्ड आणि पाइन लॅब्स यांच्याशी भागीदारी केली आहे.
कोणत्याही वाहनाच्या किमतीच्या फक्त पाच टक्के किंवा कमाल पाच हजार रुपये कॅशबॅक म्हणून दिले जातील.
कंपनी भारतात CB 200X, Hornet 2.0, X Blade, Unicorn, SP 125, Shine, Livo CBF, CD 110, Activa 6G, Dio, Activa 125 आणि Grazia सारख्या स्कूटर आणि बाइक्स विकते.
त्यापैकी सर्वात स्वस्त बाइक CD 110 आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 70315 रुपये आहे.
त्याच वेळी, सर्वात स्वस्त स्कूटरची एक्स-शोरूम किंमत Dio Standard 110 आहे, जी 71316 रुपयांपासून सुरू होते.