Red Section Separator
भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची चांगली रेंज आली आहे.
Cream Section Separator
आता इलेक्ट्रिक मार्केटमध्ये स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक कंपनी आपली सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहे.
हे लक्षात घेऊन जीटी फोर्सने (GT Force) आपली जीटी सोल वेगास इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.
कंपनीने हे इलेक्ट्रिक एक मजबूत बॅटरी पॅक आणि अनेक लेटेस्ट फीचर्ससह सादर केले आहे. चला तर जाणून घ्या या स्कूटरबद्दल सविस्तर माहिती.
कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 रंगांच्या पर्यायांसह सादर केली आहे, ज्यामध्ये ग्लासी रेड, कलर ग्रे आणि कलर ऑरेंज यांचा समावेश आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारातील किंमत 47,370 रुपये आहे आणि दुसरी लीड-अॅसिड आहे ज्याची किंमत 63,641 रुपये आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामध्ये असलेली लीड अॅसिड बॅटरी 7 ते 8 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 ते 60 किमीपर्यंत चालवता येते.
या रेंजसह, स्कूटर 25 किमी प्रतितास इतका वेग पकडण्यास सक्षम आहे.
तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन मिळेल.