Red Section Separator

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स BSE वर सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी इंट्राडेमध्ये जवळपास 10 टक्क्यांनी घसरून 3,105.90 वर आले.

Cream Section Separator

तथापि, सत्राच्या अखेरीस शेअर्स 8.51 टक्क्यांनी घसरून 3,157.15 रुपयांवर बंद झाला.

अदानी समूहाच्या या शेअरमध्ये सलग सातव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आणि या काळात शेअरमध्ये सुमारे 12 टक्के घट झाली आहे.

दुसरीकडे, 20 सप्टेंबरच्या 3,883.70 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून शेअर जवळपास 18 टक्क्यांनी घसरला आहे.

अदानी एंटरप्रायझेस, गौतम अदानी समूहाची प्रमुख कंपनी, एक वेगाने वाढणारी वैविध्यपूर्ण कंपनी आहे

कंपनी इन्क्यूबेटर म्हणून काम करते, वाहतूक आणि लॉजिस्टिक, ऊर्जा आणि उपयुक्तता क्षेत्रात नवीन व्यवसाय स्थापन करते.

अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडियासोबत 10,238 कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेसाठी करार करण्यात आला आहे.

जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसच्या निव्वळ नफ्यात 73 टक्क्यांनी वाढ होऊन ती 469 कोटी रुपये झाली आहे.

दुसरीकडे, एकत्रित महसूल 223 टक्क्यांनी वाढून 41,066 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीला इंटिग्रेटेड रिसोर्स मॅनेजमेंट आणि एअरपोर्ट बिझनेसचे खूप सहकार्य मिळाले. कंपनीचा EBITDA 107 टक्क्यांनी वाढून 1,965 कोटी रुपये झाला आहे.