Red Section Separator

अदानी समूह पुढील 5-7 वर्षांत राजस्थानमध्ये अक्षय ऊर्जेसह विविध क्षेत्रांमध्ये 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Cream Section Separator

यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 40,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

अक्षय ऊर्जा क्षेत्रातील 10,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर असल्याचे अदानी म्हणाले.

समूह राज्यातील सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्यासाठी 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल

उल्लेखनीय म्हणजे, कंपनीने अलीकडेच अंबुजा सिमेंट आणि एसीसीचे अधिग्रहण केले आहे.

अदानी म्हणाले की, राज्यातील इतर प्रकल्पांमध्ये जयपूर विमानतळाला जागतिक दर्जाची सुविधा बनवणे, पीएनजी आणि सीएनजीचे पुरवठा नेटवर्क विकसित करणे यांचा समावेश आहे.

उत्पादित अक्षय ऊर्जेसाठी नवीन पारेषण प्रकल्पही बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थान सरकारच्या अनुकूल औद्योगिक धोरणांमुळे राज्याचा निश्चितच वेगाने विकास होईल, असे ते म्हणाले.