Red Section Separator
सुपर बाईकचा विषय निघाला की त्यात कावासकीचं नाव आदरानं घेतलं जातं.
Cream Section Separator
कावासकीची निंजा सीरिज जगभरात प्रसिद्ध आहे.
याच सीरिजची बाईक 2023 कावासकी निंजा ZX-10R अलीकडेच लाँच करण्यात आली.
ही बाईक केवळ 3 सेकंदात 0-100 किमी/ तास वेग गाठते.
या बाईकचं टॉप स्पीड तब्बल 302 किमी/ तास असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
या बाईकची किंमत 15.99 लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे.
या बाईकची रायडिंग रेंज 255 किमी आहे.
ही बाईक 15 किमी/ लीटर मायलेज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
बाईकमध्ये 4 इंटिग्रेटेड मोड देण्यात आले आहेत.
बाईकला इलेक्ट्रिक स्टार्टसोबतच 6 स्पीड, रिटर्न ट्रांसमिशन सिस्टम आणि डिजिटल इन्निशन दिलं गेलं आहे.