Red Section Separator

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, 'भाडिपा'चा संस्थापक, कॉमेडियन 'जगात भारी' सारंग साठ्ये नेहमीच चर्चेत असतो.

Cream Section Separator

सारंगविषयी बोलायचं झालं तर त्याने डिजिटल विश्वात मराठी भाषेतील कंटेटला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.

त्यानं सुरू केलेलं 'भारतीय डिजिटल पार्टी' हे युट्यूब चॅनेल वेब विश्वात शांतीत क्रांती घडवून आणत आहे.

भाडिपा, भाटूपा, विषय खोल असे विविध प्लॅटफॉर्म्स सुरू करत सारंग साठ्ये डिजिटल माध्यमांमध्ये मराठी भाषेतील कंटेटची छाप सोडत आहे.

वेब सीरिज, गाणी, स्टँड अप कॉमेडी इ. विविध प्रकारातील व्हिडिओ कंटेट आणि तो ही मराठीमध्ये या चॅनेल्सवर पाहायला मिळतो आहे.

पण तुम्हाला माहितेय का स्ट्रगलच्या काळात सारंगने केलेले अनेक चित्रपट प्रदर्शितच झाले नाहीत.

'मराठी माणूस' हा सारंगचा पदार्पणाचा सिनेमा होता, ज्यात तो राधिका आपटे आणि ओंकार गोवर्धन लीड होता.

त्याने एकूण १४ सिनेमे केले होते. त्यापैकी ९ प्रदर्शितच झाले नाहीत. २ सिनेमे अक्षरश: १-२ दिवस चालले.