Red Section Separator

अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईतील वरळी भागात ४८ कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे

Cream Section Separator

५३ व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटमधून अरबी समुद्र आणि महालक्ष्मी रेसकोर्सचे विहंगम दृश्य दिसते.

माधुरीने हे लक्झरी अपार्टमेंट वरळीच्या डॉ. ई मोसेस रोडवरील इंडियाबुल्स ब्लू या सुपर प्रीमियम निवासी प्रकल्पात घेतले आहे.

सुमारे प्रति चौरस फूट ९० हजार रुपयांना हा व्यवहार झाला आहे. हा या वर्षातील सर्वात महागडा व्यवहार आहे.

माधुरीचे हे घर टॉवर सी मध्ये ५३ व्या मजल्यावर आहे. हे घर ५,३८४ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.

माधुरीच्या लक्झरी अपार्टमेंटची नोंदणी झाली आणि तिने त्यावर २.४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले.

माधुरी सध्या झलक दिखला जा या शोमध्ये परिक्षकाच्या खुर्चीत आहे.

सध्या ती झलक दिखला जा च्या प्रत्येक एपिसोडसाठी ३० लाख रुपये घेते.