Red Section Separator
कपड्यांवरील डाग हटवण्यासाठी 'या' ट्रीक्स करतील मदत
Cream Section Separator
कपडे म्हटलं की त्यांना डाग तर लागणारच हे डाग काढणं फार कठीण काम आहे
कपड्यांवरील डाग ही खूप मोठी समस्या बनली आहे.
तुम्ही कपड्यांवरील डाग हे कपड्यांना खराब न करता काढू शकता.
लिंबू : घामाचे डाग स्वच्छ करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि डाग असलेल्या भागावर लावा आणि तो भाग धुवा. यामुळे कपड्यांवरील डाग नक्कीच कमी होतात
बेकिंग सोडा : घामाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून बेकिंग सोडा वापरू शकता.
पांढरे व्हिनेगर : कपडे धुताना कोमट पाण्यात एक कप पांढरा व्हिनेगर मिसळा आणि मग त्यामध्ये कपडे भिजत घाला. यामुळे कपडे स्वच्छ होतात.
लिक्विड डिटर्जंट : डाग पडल्यानंतर लगेच कोमट पाण्यात भिजवा, नंतर त्यावर लिक्विड डिटर्जंट लावा 5-10 मिनिटे तसंच राहू द्या. यानंतर मऊ ब्रशच्या साहाय्याने डाग घासून काढा
सोडा : सोडाच्या पाण्यात कपडे पूर्ण 10 मिनिटे भिजत ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांवरील डाग तर दूर होतीलच शिवाय त्या कपड्यांमधून छान सुगंधही येईल