Red Section Separator
नात्यांचा स्नेह ऋणानुबंध व्हावा म्हणून आम्ही आपल्यासाठी दिपावलीच्या असंख्य शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
Cream Section Separator
आपण त्या नक्कीच या शुभेच्छा दिवाळीत आपल्या मित्र ,मैत्रिण संगे सोयरे यांना पाठवाल.
चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी, दिवाळीचे स्वागत घरोघरी..!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्नेहाचा सुगंध दरवळला.. आनंदाचा सण आला.. एकच मागणे दिवाळी सणाला.. सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावली शुभेच्छा! दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट.. दिव्यांची आरास, फराळाचे ताट.. फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट.. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली..!
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो.. दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा..!