Red Section Separator
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मूल सहा महिन्यांचं झाल्यानंतर त्याला सॉलिड फूड सुरू करता येतं.
Cream Section Separator
सहा महिन्यानंतर मुलाला पिकलेलं केळ भरवणं योग्य असतं.
केळात मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशिअम आणि सूक्ष्म पोषक घटक असतात.
केळात मुबलक प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी उपयुक्त ठरतं.
केळी खाण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची झीजही भरून निघण्यास मदत होते.
केळात कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण लक्षणीय असतं.
लहान मुलांच्या हाडांचा विकास होण्यासाठी आणि हाडं बळकट होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
केळ्यात व्हिटॅमिन सी आणि बायोॲक्टिव्ह कंपाउंड असल्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
रात्रीच्या वेळी बाळाला केळ भरवणं टाळावं. त्यामुळे सर्दी, कफ आणि खोकला वाढण्याची शक्यता असते.