महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण आहे भारतातील सर्वात सुंदर Hill Station ; डोनाल्ड ट्रम्पच्या वाहनाला सुद्धा इथे नो एंट्री, पिकनिकसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण

उन्हाळी सुट्टी मध्ये पिकनिकचा प्लॅन असेल तर माथेरान हे तुमच्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरणार आहे. हे देशातील सर्वात छोटे हिल स्टेशन असून आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशनचा दर्जा याला मिळालेला आहे.

Published on -

Maharashtra Best Picnic Spot : उन्हाळा सुरू झाला की भ्रमंती करणारे लोक हिल स्टेशन कडे वळतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात हिल स्टेशनवर पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशा एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटची माहिती सांगणार आहोत जिथे वाहनांना नो एन्ट्री आहे.

हे भारतातील असे एकमेव हिल स्टेशन आहे जिथे वाहने जाऊ शकत नाही. अगदीच डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरीदेखील त्यांच्या वाहनांना या ठिकाणी नो एन्ट्री राहणार आहे.

हो अगदीच बरोबर वाचताय तुम्ही भारतात असे एक ठिकाण आहे जिथे पर्यटकांना पायी चालून जावे लागते. आम्ही ज्या हिल स्टेशन बाबत बोलत आहोत ते हिल स्टेशन आपल्या राज्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे देशातील सर्वात छोट हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं.

महत्त्वाचे म्हणजे या हिल स्टेशनची सुंदरता एवढी अधिक आहे की येथे वाहनांची नो एंट्री असतानाही पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. या पिकनिक स्पॉटची सुंदरता शब्दात व्यक्त करणे थोडे कठीणच आहे.

असे म्हणतात की हे हिल स्टेशन आशिया खंडातील एकमेव असे हिल स्टेशन आहे जे की वाहनमुक्त ठेवण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी प्रचंड शांतता पाहायला मिळते आणि गोंगाटापासून क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

माथेरानला काय-काय पाहणार?

माथेरान हे असे एक हिल स्टेशन आहे ज्याला प्रदूषणमुक्त पिकनिक स्पॉटचा दर्जा देण्यात आला आहे. हे हिल स्टेशन 2600 फुट उंचीवर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती आहे.

राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशभरातील पर्यटक या छोट्याशा हिल स्टेशनवर प्रचंड गर्दी करतात. काही बाहेर देशातील लोक सुद्धा या ठिकाणी पिकनिकचा आनंद घ्यायला येतात.

या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून 803 मीटर इतकी आहे. येथील इको पॉईंट, लुइसा पॉइंट, चार्लोट झील, मंकी पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉईंट, माथेरान लॉर्ड पॉईंट, माथेरान सनसेट पॉईंट ही माथेरानचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे.

माथेरानला कसं पोहोचणार?

तुम्ही आर्थिक राजधानी मुंबईत वास्तव्याला असाल तर तुम्ही मुंबईहून बदलापूर-कर्जत रस्त्याने नेरळचा घाट चढल्यावर माथेरनच्या पायथ्यापर्यंत पोहचू शकता. मात्र हे हिल स्टेशन वाहन मुक्त असल्याने तुम्हाला फक्त माथेरानच्या पायथ्यापर्यंतच वाहनाने जाता येणार आहे.

येथून पुढे माथेरान हिल स्टेशनची हद्द सुरु होते. म्हणून तुम्ही माथेरानच्या पायथ्याला पोहोचलात की तुम्हाला तिथेच वाहने पार्क करुन पुढचा प्रवास करावा लागतो. म्हणजे तुम्हाला यापुढील प्रवास पायी करावा लागतो.

किंवा मग ढकलगाडी अथवा घोड्यावर बसून तुम्ही हे सुंदर ठिकाण एक्सप्लोर करू शकता. दरम्यान, तुम्ही जर या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला नेरळला उतरावे लागणार आहे. नेरळ स्टेशनला उतरुन तिथून तुम्ही माथेरानला पोहचू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News