भारतात 5 रुपयांत मिळणाऱ्या Parle-G बिस्किटाची किंमत 'या' ठिकाणी 2400 रुपये !

पार्ले-जी बिस्किट बालपणापासून अनेकांच्या आवडीचे खाद्यपदार्थ असून ते देशभरात सहज उपलब्ध असते.

भारतामध्ये फक्त 5 रुपयांत सहज  उपलब्ध असलेले पार्ले-जी गाझामध्ये 2400 रुपयांत विकले जाते आहे

इस्रायल-गाझा संघर्षामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा प्रदेशात या बिस्किटची किंमत आकाशाला भिडलीय

गाझामध्ये सध्या अन्नधान्याची गंभीर टंचाई आहे. या भागात मानवी मदत मिळण्याचे प्रमाण खूपच कमी असून,

इस्रायली नाकेबंदीमुळे आवश्यक वस्तू वेळेवर पोहोचत नाहीत.

त्यामुळे गाझा येथील रहिवाशांना रोजच्या गरजा भागवण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

या गंभीर परिस्थितीत, भारतात 5 रुपयांना उपलब्ध असलेले पार्ले-जी बिस्किट गाझामध्ये हजारो रुपयांना विकले जात आहे.