8 वर्ष…. कोणताही ताण नाही! या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर सर्वाधिक वॉरंटी मिळते
भारतीय बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या खूप झपाट्याने वाढत असून यामध्ये विशेष करून इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढताना आपल्याला दिसून येत आहे.
बॅटरी लाईफ
बॅटरी लाईफबद्दल चिंता पण तरीही अनेक लोकांच्या मनात इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी लाईफबद्दल प्रश्न निर्माण होतात.
भारतातील सर्वात बॅटरी लाईफ असलेल्या स्कूटर
आज आम्ही तुम्हाला संपूर्ण देशात विकल्या जाणाऱ्या टॉप 3 इलेक्ट्रिक स्कूटरची ओळख करून देऊ, जे सर्वात जास्त बॅटरी लाइफ आणि वारंटी असल्याचा दावा करतात.
ओला इलेक्ट्रिक
ओला इलेक्ट्रिक ही कंपनी ओला इलेक्ट्रिकच्या S1 मालिकेवर मानक 3 वर्ष/40000 कीमी वारंटी देते. जी विस्तारित वारंटी खरेदी करून 8 वर्ष किंवा 80 हजार किमी पर्यंत वाढवता येते.
एथर एनर्जी
एथर एनर्जी त्यांच्या स्कूटरवर 3 वर्ष पर्यंत वारंटी देत आहे. याशिवाय प्रो पॅक एक्सटेंडेड वारंटी पॅकेज अंतर्गत 8 वर्ष किंवा 80000 किमीची वारंटी उपलब्ध आहे.
सिम्पल एनर्जी
बेंगळूर च्या ईव्ही स्टार्टअप सिंपल एनर्जी देखील 8 वर्षे किंवा 60000 किमीची एक्सटेंडेड वारंटी देते. त्यामध्ये बॅटरी आणि मोटर दोन्ही समाविष्ट आहेत.