यावर्षी श्रावण महिना 11 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल.

खरं पाहायला गेले तर 13 जुलै रोजी, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी, न्यायदेवता शनि वक्री म्हणजेच मीन राशीत वक्री होईल आणि दुसरीकडे 18 जुलै रोजी ग्रहांचा राजकुमार बुध देखील वक्री होईल

तसे पाहायला गेले तर ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांची वक्री चाल ही खूप अशुभ मानली जाते. परंतु श्रावण महिन्यामध्ये या ग्रहांची वक्री हालचाल शुभ मानले जाते.

चला जाणून घेऊया की श्रावणमध्ये शनि आणि बुध वक्री राहिल्याने कोणत्या राशींना फायदा होईल.

 वृषभ-

श्रावण महिन्यामध्ये शनी आणि बुध यांच्या वक्री चालीमुळे वृषभ राशींच्या लोकांच्या पैशाच्या समस्या संपतील व त्यामुळे ते भविष्यात गुंतवणूक करायला सक्षम होतील. हा कालावधी व्यावसायिकांसाठी फायदेशीर मानला जातो. नोकरीची परिस्थिती सुधारेल.

 कर्क-

कर्क राशीचे लोक त्यांच्या पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकतील. कामाच्या ठिकाणी लोक तुमची प्रशंसा करतील व त्यामुळे भविष्यात खूप मोठा फायदा होईल. इतकेच नाहीतर तुम्ही नवीन काम सुरू करू शकाल.

 मीन-

मीन राशीचे लोक ऑफिसमध्ये चांगली कामगिरी करू शकतील व त्यांच्या शत्रूंवर विजयी होतील. तसेच आरोग्यात सुधारणा पाहायला मिळेल व विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला फायदा होईल.