पुणेकरांसाठी नोव्हेंबर महिना ठरणार खास ! 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार नवीन रेल्वेगाडी, ‘या’ 10 Railway Station वर थांबणार

Published on -

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिना पुणेकरांसाठी वरदान ठरणार आहे. कारण पुणेकरांना या महिन्यात एका नव्या एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळणार आहे. ही नवीन गाडी पुण्याला मराठवाड्यासोबत कनेक्टिव्हिटी देणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे स्थानकावरून हुजूर साहिब नांदेडसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे पुणे ते नांदेड हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ही स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे मार्गावर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पहाता मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

या नव्या गाडीचा लातूर – कुर्डूवाडी रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा फायदा होणार असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कसे राहणार टाईम टेबल?

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड – हडपसर विशेष गाडी 18 व 25 नोव्हेंबर रोजी नांदेड येथून सकाळी साडेआठ वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी त्याच दिवशी रात्री साधारणता पावणेदहा वाजेच्या सुमारास हडपसर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

तसेच हडपसर – नांदेड ही साप्ताहिक विशेष गाडी 18 व 25 नोव्हेंबर 2025 रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी दुपारी सव्वा बारा वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

हडपसर – नांदेड यादरम्यान चालवण्यात येणारी साप्ताहिक विशेष गाडी 22 डब्यांची राहणार आहे. या गाडीमुळे लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. या नव्या गाडीमुळे आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मात्र घेता येणार आहे.

यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन्ही विभाग एकमेकांना रेल्वेने कनेक्ट होतील. या गाडीमुळे नांदेड, परळी, लातूर आणि कुर्डूवाडी परिसरातील रेल्वे प्रवाशांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. येथील प्रवाशांना एक नवीन प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. 

कोणकोणत्या स्थानकावर घेणार थांबा?

मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ते हडपसर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील एकूण दहा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

ही विशेष गाडी या मार्गावरील पूर्ण परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डूवाडी आणि दौंड या महत्त्वपूर्ण स्थानकावर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News