Farmer Scheme : PM किसान सम्मान निधी योजना अंतर्गत नोंदणीकृत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर शेतकरी आता पुढील, म्हणजेच 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारने 19 नोव्हेंबर 2025 रोजी या योजनेचा 21वा हप्ता जारी केला होता.
तब्बल 9 कोटी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात आली. आता पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारला जात आहे.

होळीपूर्वी म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 22वा हप्ता वितरित होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र, यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
तरीदेखील, मागील काही वर्षांच्या पद्धतीनुसार आणि 19वा तसेच 21वा हप्ता जारी करण्याच्या तारखांच्या तुलनेत हा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या हप्त्यात म्हणजेच 21व्या हप्त्यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकल्याचे समोर आले होते.
याचे प्रमुख कारण e-KYC तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न झाल्याचे सांगितले जाते. यावेळी अशी समस्या उद्भवू नये म्हणून सरकारने शेतकऱ्यांना सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
e-KYC कशी करावी?
PM Kisan योजनेसाठी e-KYC अनिवार्य करण्यात आली असून ही प्रक्रिया शेतकरी घरबसल्या पूर्ण करू शकतात. यासाठी PM Kisan ची अधिकृत वेबसाइट उघडा.
Home Page वर दिसणाऱ्या e-KYC पर्यायावर क्लिक करा. नवीन पेजवर तुमचा Aadhaar Number टाका. मग ‘Search’ वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येणारा OTP टाका.
सबमिट केल्यानंतर तुमची e-KYC यशस्वीरीत्या पूर्ण होते. योग्य वेळेत KYC अपडेट न झाल्यास हप्ता रोखला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर e-KYC पूर्ण करावी.
केंद्र सरकारकडून दरवर्षी तीन हप्त्यांद्वारे एकूण 6,000 रुपये अनुदान दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी कामांसाठी आर्थिक मदत मिळते. आता आगामी 22व्या हप्त्याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची अपेक्षा असून शेतकरी यातून लाभ घेण्यास उत्सुक आहेत.













